राहुल गांधींनी पुरावे द्यावेत : येडीयुरप्पा

वृत्तसंस्था
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

बंगळूर: काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी जर पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येसाठी रा. स्व. संघ, तसेच उजव्या विचारसरणीला जबाबदर धरत असतील तर त्यांनी आपल्या आरोपांच्या पुष्ट्यर्थ पुरावे सादर करावेत, अशी मागणी कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडीयुरप्पा यांनी आज येथे केली.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ""राहुल गांधी यांच्याकडे जर पुरावे असतील तर त्यांनी ते सादर करावेत. या आरोपांच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने स्थापन केलेल्या "एसआयटी'कडून निःपक्ष चौकशी होईल, यावर विश्‍वास ठेवता येईल का असे आम्ही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना विचारत आहोत.''

ते म्हणाले, ""संपूर्ण चौकशी पूर्ण होऊ द्या. यात जे दोषी आढळतील त्यांना फासावर लटकवावे. भाजपचा त्याला आजिबात आक्षेप असणार नाही. राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यात राज्य सरकारला पूर्ण अपयश आले आहे. त्यामुळेच राज्यात भाजप कार्यकर्त्यांच्या, पत्रकारांच्या, तसेच डाव्या विचारवंतांच्या हत्या होत आहेत. किमान गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी तरी सरकारने दोषींना पकडावे आणि शिक्षा करावी.''