सेल्फी घेणाऱ्या तीन युवकांना रेल्वेने चिरडले

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

बंगळूर: रेल्वेसोबत सेल्फी घेणे तीन युवकांच्या जीवावर बेतल्याची घटना कर्नाटकातील हेजजला आणि बिदादी स्थानकादरम्यान आज सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. रुळावर सेल्फी घेणाऱ्या तीन युवकांना म्हैसूरहून बंगळूरला जाणाऱ्या गोलगुंबज एक्‍स्प्रेसने अक्षरश: चिरडल्याने घटनास्थळाचे दृश्‍य हदयद्रावक होते.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार ते तिन्ही युवक सेल्फी घेत होते. तिघांची ओळख पटली असून, प्रतीक, रोहित आणि प्रभू असे त्यांचे नाव असून ते 17 ते 20 वयोगटातील आहेत. तिघेही बंगळूरच्या प्री यूनिव्हर्सिटीमध्ये पदवी अभ्यासक्रमाला शिकत होते. आज सकाळी साडेआठच्या सुमारास वॉंड्रेला पार्क येथे पिकनिक करण्यासाठी घराबाहेर पडले. मात्र वाटेत थांबवून ते रेल्वेरुळाच्या समोरच सेल्फी घेऊ लागले. सेल्फी घेण्याच्या नादात त्यांना रिकाम्या मार्गावरून एक्‍स्प्रेस रेल्वे कधी आली हे कळालेच नाही.

रेल्वे पोलिस अधीक्षक एन. चैत्र यांनी सांगितले की, मृत युवकांच्या दोन दुचाकी गाड्या म्हैसूर रोडलगत असलेल्या एका रेल्वेरुळाजवळ आढळून आल्या.