बवाना पोटनिवडणुकीत 'आप'चा विजय; भाजपला झटका

वृत्तसंस्था
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

अंतिम निकाल -
राम चंदेर (आप) - 59886 मते
वेद प्रकाश (भाजप) - 35834 मते
सुरेंद्र कुमार (काँग्रेस) - 31919 मते

नवी दिल्ली - दिल्लीतील बवाना विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाचे (आप) उमेदवार राम चंदेर यांनी विजय मिळविला असून, चंदेर यांच्या विजयामुळे भाजपला झटका बसला आहे.

दिल्लीत 2015 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बवानामध्ये आपने विजय मिळविला होता. आपचे आमदार वेद प्रकाश यांनी महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केल्याने याठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात आली. वेद प्रकाशने ही पोटनिवडणूक भाजपच्या तिकीटावर लढविली. पण, त्याला पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीत आप, भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार लढत होती. 

काँग्रेसच्या उमेदवाराने सुरवातीच्या काही फेऱ्यांमध्ये आघाडी घेतली होती. पण, नंतर आपचे उमेदवार राम चंदेर यांनी आघाडी घेत अखेरपर्यंत ती टिकवून ठेवत 24052 मतांनी विजय मिळविला. काँग्रेसच्या उमेदवाराला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. 

अंतिम निकाल -
राम चंदेर (आप) - 59886 मते
वेद प्रकाश (भाजप) - 35834 मते
सुरेंद्र कुमार (काँग्रेस) - 31919 मते