बँकांनी गोठवले BCCI चे खाते; सामन्यांवर सावट!

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 ऑक्टोबर 2016

मुंबई - भारतीय क्रिकेट संघ क्रिकेट विश्‍वात वेगळी उंची प्राप्त करत असतानाच लोढा समितीने उपस्थित केलेल्या प्रश्‍नामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) बॅंक खाते गोठविण्यात आली आहेत. त्यामुळे न्युझीलंडविरुद्धच्या सामन्यांवर संकटाचे सावट दाटून आले आहेत.

लोढा समितीने लिहिलेल्या ई-मेलची दखल घेत बीसीसीआयची खाती असलेल्या येस बॅंक आणि बॅंक ऑफ महाराष्ट्रने बीसीसीआयची बॅंक खाती गोठविली आहेत. लोढा समिती ही सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेली समिती असल्याने असा निर्णय घेतल्याची माहिती बॅंकेने दिली आहे. तर बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार "जे पैसे बीसीसीआयचे आहेत आणि ते त्यांचेच सदस्य असलेल्या संघटनांना नियमांनुसार वितरित केले आहेत. त्यावर लोढा समितीने प्रश्‍न उपस्थित केले आहेत. "अशा परिस्थिती पैसे नसताना न्युझीलंडविरुद्धच्या सामन्यात (खेळाडूंची) निवासाची व्यवस्था कशी करणार?‘, असा प्रश्‍नही बीसीसीआयने उपस्थित केला आहे.

याबाबत लोढा समितीने एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार "6 ऑक्‍टोबरपर्यंत प्रतिक्षा करा. प्रत्येक मुद्यावर तोडगा काढला जाईल‘ असे म्हटले आहे. मात्र बीसीसीआय कार्यकारी समितीतील कोणत्याही सदस्याला लोढा समितीने चर्चा केली नसल्याचेही वृत्त आहे.