गोव्याबरोबरच देशात 'बीफ बंदी' करा - पिंगळे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

गाय हा हिंदूंच्या आस्थेचा विषय आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी गोवंश रक्षणाचा विचार मांडला होता. सर्वोच्च न्यायालयाने देखील स्पष्ट निर्देश दिले असल्याने गोव्यात आणि देशात गोमांस बंदी लागू व्हायला हवी अशी मागणी डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी आज हिंदू जनजागृती समितीच्या व्यासपीठावरुन केली.

पणजी: गाय हा हिंदूंच्या आस्थेचा विषय आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी गोवंश रक्षणाचा विचार मांडला होता. सर्वोच्च न्यायालयाने देखील स्पष्ट निर्देश दिले असल्याने गोव्यात आणि देशात गोमांस बंदी लागू व्हायला हवी अशी मागणी डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी आज हिंदू जनजागृती समितीच्या व्यासपीठावरुन केली.

फोंडा येथे 14 ते 17 जून दरम्यान आयोजित अखिल भारतीय हिंदू आधिवेशनाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत गोमांसबंदी हा विषय अजेंड्यावर असेल, असे पिंगळे यांनी स्पष्ट केले. हिंदू राष्ट्राची निर्मिती, गो रक्षा,काश्‍मीरी हिंदूचे पुनर्वसन,शेजारील बांगलादेश आणि श्रीलंकेत हिंदूवर होणाऱ्या अत्याचारांवर अधिवेशनात चर्चा केली जाणार आहे.