एक कोटींच्या दारूच्या बाटल्यांवर बुलडोजर

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 मे 2018

अहमदाबाद : गुजरात दारूमुक्त राज्य असून, राज्यात बेकायदेशीरपणे दारू विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाते. अहमदाबाद पोलिसांनी मागील काही दिवसांपूर्वी एक कोटींची दारू पकडली. जप्त केलेल्या दारूच्या बाटल्यांवर पोलिसांनी बुलडोजर चालवला आणि सुमारे एक कोटींची दारू नष्ट केली.

राज्यात बेकायदाशीरपणे आढळलेल्या दारूच्या बाटल्या पोलिसांनी जमा केल्या होत्या. या जमा झालेल्या दारुच्या बाटल्या एकत्र करून पोलिसांनी रस्त्यावर ठेऊन सगळ्या बाटल्यांवर बुलडोजर चालवला. दारूच्या या काळ्या बाजारावर माहिती देताना गृहविभागाने विधानसभेत आकडेवारी जारी केली. गुजरात सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार गुजरातमध्ये मागील दोन वर्षांमध्ये 147 कोटी 78 लाख 70 हजाराची दारू जप्त करण्यात आली. 

राज्यातील 31 जिल्ह्यातून 16033 वाहने पकडण्यात आली. या सर्व वाहनांचा वापर दारूची तस्करी करण्यासाठी केला जात होता. या सर्व वाहनांमध्ये 3,13,642 देशी दारू आणि 90,22,408 विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या होत्या.

Web Title: Beer Bottle Destroyed in Ahmadabad