महिलेचा तरुणावर ॲसिड हल्ला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

बेळगाव - एका तरुणामुळे भाच्याचे प्रेमप्रकरण उघडकीस आणल्यामुळे संतापलेल्या महिलेने एका तरुणावर ॲसिड हल्ला केला. २६ वर्षीय तरूण जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रथमेश असे जखमी तरुणाचे नाव आहे. हल्लेखोर महिलेला नागरिकांनीच पोलिसांच्या ताब्यात दिले. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.

याबद्दल मिळालेली माहिती अशी, येथील एका प्रसिद्ध मंदिराच्या पुजाऱ्याच्या मुलाचे एका मुलीशी प्रेमप्रकरण होते. ते दोघे मंदिरात सदर तरुणाला दिसले होते. ही माहिती त्या तरूणाने इतर गल्लीतील लोकांना सांगितले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या घटनेत तथ्य आढळून आले. 

या परिसरातील लोकांनी सदर पुजाऱ्याचा हक्क काढून घेतला. तीन आठवड्यांपूर्वी घडलेल्या या घटनेचा राग पुजाऱ्याच्या बहिणीला होता. आज रात्री १०.३० च्या सुमारास मंदिराजवळून घरी जात असताना पुजाऱ्याच्या बहिणीने सदर तरूणावर ॲसिड फेकले. यामध्ये सदर तरूणाच्या हातावर व पोटावर ॲसिड पडले असून तो जखमी झाला आहे. त्याला सिव्हीलमध्ये दाखल केले आहे. 

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मंदिराजवळ जमले. यावेळी पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. सदर महिलेला ताब्यात घेऊन खडेबाजार पोलिस ठाण्यात नेले. ठाण्यासमोर रात्री उशिरापर्यंत जमाव जमून होता. रात्री उशिरापर्यंत महिलेच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Web Title: Belgaum News acid attack on youngster by woman