आयुक्तांच्या बैठकीवर महापौरांचा बहिष्कार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 जून 2017

बेळगाव: महापालिका आयुक्त शशीधर कुरेर यानी बोलावलेल्या बैठकीवर आज (शुक्रवार) महापौर संज्योत बांदेकर यानी बहिष्कार टाकला. बेळगाव शहरासाठी नवे बांधकाम नियम तयार करण्यात येणार आहेत. त्याबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. आयुक्तानीच ही बैठक बोलावली होती.

बेळगाव: महापालिका आयुक्त शशीधर कुरेर यानी बोलावलेल्या बैठकीवर आज (शुक्रवार) महापौर संज्योत बांदेकर यानी बहिष्कार टाकला. बेळगाव शहरासाठी नवे बांधकाम नियम तयार करण्यात येणार आहेत. त्याबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. आयुक्तानीच ही बैठक बोलावली होती.

आज सकाळी अकरा वाजता आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या मुख्य सभागृहात ही बैठक होणार होती. पण आयुक्त व अधिकारी या बैठकीसाठी तब्बल दोन तास उशिरा आले. त्यामुळे महापौर बांदेकर, बांधकाम स्थायी समिती अध्यक्ष विनायक गुंजटकर, अर्थ स्थायी समिती अध्यक्ष रतन मासेकर यानी बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे केवळ अधिकारी व बांधकाम व्यावसायिकांच्या उपस्थितीत आयुक्त कक्षात ही बैठक पार पडली. बहिष्काराचा निर्णय घेवून महापौरानी आपण कमकुवत नसल्याचे आयुक्ताना दाखवूप दिले. बेळगाव उत्तरचे आमदार फिरोज सेठ यांच्यासाठी आयुक्त बांधकाम नियमांच्या बैठकीला विलंबाने आले. सकाळी साडेदहा वाजता अचानक आमदार सेठ महापालिकेत आले व त्यांनी आढावा बैठक घेणार असल्याचे आयुक्ताना सांगितले. त्यानुसार आयुक्त, दोन्ही शहर अभियंते व बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी आमदारांच्या बैठकीत सहभागी झाले. महापालिकेच्या मुख्य कार्यालयातील आमदारांच्या कक्षात ही बैठक झाली. आयुक्त आमदारांच्या बैठकीत व्यस्त झाले, त्यामुळे बांधकाम नियमांच्या बैठकीला आलेले महापौर, स्थायी समिती अध्यक्ष तसेच हेस्कॉम, अग्नीशमन विभाग, बुडा व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्याना तिष्ठत बसावे लागले. आधी अकरा ऐवजी बारा वाजता बैठक होईल असा निरोप नगररचना विभागाकडून महापौर, स्थायी समिती अध्यक्ष व अन्य विभागाच्या अधिकार्याना देण्यात आला.

■ ई सकाळवरील महत्वाच्या बातम्या

"भारत-सिंगापूर' मैत्रीमुळे चीन अस्वस्थ!
पवार 'समृद्धी' प्रकल्पाच्या विरोधात कसे?
#स्पर्धापरीक्षा - भारत-अमेरिका संरक्षण करार
'मुदतपूर्व'च्या फुक्‍या जोर-बैठका
पतधोरणाची पावले योग्य दिशेने
रविवारी भारत - पाकचा लंडनला डबल धमाका
भाजपचे अध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल
कराल "नायगरा'ने गिळले विक्रमवीरास..
पुरूष नाटकामागे घडलेले नाट्य प्रथमच रंगमंचावर
लंडन : अग्नितांडवात किमान 65 मृत्युमुखी?
'SCO'त मतभेदांना स्थान नाही
ध्वनिक्षेपकावरून एकाच वेळी 'अजान'
लोकवर्गणीतून 7 कि.मी.पर्यंत नदीचे खोलीकरण व रुंदीकरण