बेळगावात काळ्यादिनाच्या फेरीस प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

बेळगाव - एक नोव्हेबर 1956 रोजी मराठी बहुल भाग म्हैसूर प्रांतामध्ये समाविष्ट केला याच्या निषेधात तेव्हापासून दरवर्षी काळा दिन पाळण्यात येतो. यंदाही काळ्यादिनानिमित्त मुक सायकल फेरी काढण्यात आली आहे. या फेरीला संभाजी उद्यान येथून प्रारंभ झाला आहे.

महापाैर संज्योत बांदेकर यांच्यासह बेळगाव महापालिकेतील मराठी नगरसेवक या फेरीमध्ये सहभागी झाले आहे. सुमारे 25 ते 30 हजार मराठी भाषिकांचा सहभाग या फेरीत आहे. हजारोंच्या संख्येने काळे झेडें हातात घेऊन कर्नाटक आणि केंद्र सरकारचा निषेध करण्यात येत आहे. निषेधाचे फलक हातात घेऊन तरुण-तरुणींचा मोठा सहभाग या फेरीत दिसून येत आहे. माैनातून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. कपिलेश्वर रेल्वे उड्डाण पुल आणि एसपीएम रोडवर फेरी पोहोचली असून महाराष्ट्रातूनही अनेक मान्यवर या फेरीत सहभागी होत आहेत.  आमदार नीतश राणे फेरीमध्ये सहभागी होण्यासाठी बेळगावात दाखल झाले असून महात्मा फुले रोडवर ते फेरीत सहभागी होतील

फेरीच्या निमित्ताने प्रंचड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सीमाभागात व्यवहार कडकडीत बंद ठेऊन काळा दिन पाळण्यात येत आहे. निपाणीसह परिसरात आज बंद पाळण्यात आला आहे.  

Web Title: Belgaum News Black Day rally starts