भाजपचे आमदार संजय पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल

संजय सूर्यवंशी
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

बेळगाव  - सार्वजनिक सभेत जातीय तणाव निर्माण करणारे भडकावू भाषण केल्याचा ठपका ठेवत आमदार संजय पाटील यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 

बेळगाव  - सार्वजनिक सभेत जातीय तणाव निर्माण करणारे भडकावू भाषण केल्याचा ठपका ठेवत आमदार संजय पाटील यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 

गुरुवारी सायंकाळी सुळेभावी येथे भाजपची सभा झाली. याठिकाणी भाषणावेळी बेळगाव ग्रामीणचे आमदार संजय पाटील यांनी भडकावू भाषण केले असल्याचा ठपका ठेवत भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी मारिहाळ पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी दोन जातींमध्ये तेढ निर्माण करणे, सामाजिक शांततेचा भंग करणे या कलमांखाली गुन्हा दाखल करून घेतला आहे पोलीस निरीक्षक विजयकुमार सिन्नुर तपास करीत आहेत.

Web Title: Belgaum News crime against MLA Sanjay Patil