बेळगावः साडेसात हजार पोलिस; 300 सीसीटीव्ही

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

गणेशोत्सवातील बंदोबस्त; पोलीस आयुक्तांची पत्रकार परिषदेत माहिती

बेळगाव: गणेशोत्सव बंदोबस्ताची तयारी पूर्ण झाली असून, 7500 पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. वाहतूक व्यवस्थापन केंद्राचे 90 तसेच संवेदनशील, अतिसंवेदनशील व मिरवणूक मार्गावर 210 अशा 300 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संपूर्ण शहरावर नजर राहणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त टी. जी. कृष्णभट यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गणेशोत्सवातील बंदोबस्त; पोलीस आयुक्तांची पत्रकार परिषदेत माहिती

बेळगाव: गणेशोत्सव बंदोबस्ताची तयारी पूर्ण झाली असून, 7500 पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. वाहतूक व्यवस्थापन केंद्राचे 90 तसेच संवेदनशील, अतिसंवेदनशील व मिरवणूक मार्गावर 210 अशा 300 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संपूर्ण शहरावर नजर राहणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त टी. जी. कृष्णभट यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गणेशोत्सव बंदोबस्ताबाबत माहिती देण्यासाठी आज त्यांनी पोलिस परेड मैदानावर पत्रकार परिषद घेतली. आयुक्त म्हणाले, बंदोबस्तासाठी जिल्ह्यातील 4 हजार 102 पोलिस तर परजिल्ह्यातून 3 हजार 413 कुमक मागविण्यात आली आहे. गणेशोत्सव काळात मद्यविक्री बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. 25 ऑगस्ट सकाळी सहा ते 26 रोजी सकाळी सहा या काळात तसेच 5 सप्टेंबर सकाळी सहा ते ते 6 सप्टेंबर सकाळी सहा या काळात मद्यविक्री बंद राहणार आहे. गणेशोत्सव व बकरी ईद एकाच काळात आल्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर यापूर्वीच प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्तालयात 2, उपविभागात 3 व प्रत्येक पोलिस ठाण्यांमध्ये 34 अशा शांतता समितीच्या सभा घेतल्या आहेत. या ठिकाणी डॉल्बीबंदी वेळेत मिरवणूक आवरण्याची सूचना केलेली आहे. महापालिका, हेस्कॉम, प्रदूषण नियंत्रण मंडळसह विविध सरकारी विभागाकडून उत्सव मंडळासाठी लागणाऱ्या बाबींना मंजुरी मिळावी, यासाठी पोलिस ठाण्यातच एक खिडकी सुरू केली. तेथील कार्य सुरळीत सुरू असल्याचेही आयुक्तांनी सांगितले. मिरवणूक मार्गावर तसेच प्रतिष्ठापनेच्या दिवशी शहरात प्रखर प्रकाशझोत असावा, यासाठी प्रखर दिवे लावण्यासाठी महापालिकेला पत्र लिहिले आहे. मिरवणुकीतील प्रत्येक घडामोडीवर नजर राहावी, यासाठी शहरात 300 सीसीटीव्ही कार्यरत राहणार आहेत. त्यामुळे समाजकंटकाची प्रत्येक हालचाल कॅमेऱ्यात बद्ध होणार असल्याने कोणीही कायदा मोडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

विशेष बंदोबस्ताचीही तयार
12 दिवसाच्या गणेशोत्सव काळात 19 चिता मोटारसायकलीवरून पोलिस अधिकारी व कर्मचारी गस्त घालणार आहेत. याशिवाय 12 पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 18 रक्षक वाहनेही गस्तीवर राहतील. 2 सुरक्षक वाहने चोवीस तास सेवा बजावणार आहेत. शिवाय महिलांसाठी खास बनविलेले चन्नम्मा पथक सतत कार्यरत राहणार आहे.

एकूण पोलिस बंदोबस्त
हुद्दा - जिल्ह्यातील कुमक - परजिल्ह्यातील कुमक

पोलिस आयुक्त*01*02
डीसीपी व एसपी*4*14
एसीपी व डीएसपी*18
पोलिस निरीक्षक*64*44
उपनिरीक्षक*98*78
सहायक उपनिरीक्षक*270*180
कॉन्स्टेबल हेडकॉन्स्टेबल*2722*2245
महिला पोलिस*75*00
होमगार्ड 850

याशिवाय केएसआरपी तुकड्या-10, शहर सशस्त्र दल-02 व क्‍युआरटीची एक तुकडी बंदोबस्तावर राहणार आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
'प्रायव्हसी' हा मूलभूत अधिकार, जीवनाचा अविभाज्य घटक- सर्वोच्च न्यायालय
मोहर्रम असल्याने दुर्गा विसर्जनास परवानगी नाही: ममता बॅनर्जी
गौराईचं कौतुकच न्यारं... गौरी गणपतीच्या गाण्यांचा खजिना
ज्येष्ठांच्या पुढाकाराने सरला शिवारातला दुष्काळ
परभणी: कर्जाच्या विवंचनेतून शेतकर्‍याची अात्महत्या
सर केले तीन गड
तांदूळ, तीळ, मोहरीवर लिहिले सात ग्रंथ
कऱ्हाड: अठरा नख्यांचे कासव आढळले मृत अवस्थेत
बीड: चोरट्यांनी फोडली पोलिस ठाण्याजवळील सहा दुकाने
आजही 'ती' पुन्हा बिघडली; मेढा आगाराचा भोंगळ कारभार
प्लांट टिशू कल्चर लॅब’ सुरू होण्यापूर्वीच रद्द
ग्रामपंचायत करणार रस्त्यावर फलक लावून दारू विक्री
गवताचा बाप्पा आशीर्वादासाठी सज्ज!