आता हालसिद्धनाथ कारखाना, निपाणी नगरपालिका निवडणूकीकडे लक्ष

आता हालसिद्धनाथ कारखाना, निपाणी नगरपालिका निवडणूकीकडे लक्ष

निपाणी - विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपते न संपते तोच आता हालसिध्दनाथ सहकारी साखर कारखाना व निपाणी नगरपालिका निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. अवघ्या तीन-चार महिन्यावर येऊन ठेपलेल्या या निवडणुकांकडे निपाणी भागाचे लक्ष लागले आहेत. हळूहळू राजकीय पटलावर त्या दिशेने आडाखे बांधले जात आहेत. 

हालसिद्धनाथ कारखान्याचे विस्तारीकरण व आधुनिकीकरण झाले असून नवीन कारखान्यात गत गाळप हंगाम पार पडला. गाळप झालेल्या उसाला कारखान्याने 3151 रुपये प्रतिटन असा राज्यात उच्चांकी दर घोषीत केला. केवळ प्रारंभीच्या उसाला हा दर मिळाला. त्यानंतर 2500 रुपयाप्रमाणे बिल मिळाले. शिवाय फेब्रुवारीत गाळप झालेल्या उसाची बिले अद्याप देणे बाकी आहे. आधुनिकीकरण, विस्तारीकरणामुळे कारखान्यावर सुमारे 225 कोटीवर कर्जाचे ओझे आहे. अशातच विधानसभा निवडणुकीत कारखान्यातील संचालक मंडळात फूट पडल्याने चेअरमन प्रा. सुभाष जोशी व व्हाईस चेअरमन अनिता पाटील यांनी आपण अल्पमतात असल्याचे सांगून राजीनामा दिला आहे.

विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने जोरदार वातावरण निर्माण केले तरी प्रत्यक्षात भाजपच्या आमदार शशिकला जोल्ले विजयी झाल्या. या निकालाने कारखाना निवडणुकीवर फोकस करण्यावर दोन्ही पक्षांनी जोर दिला आहे. 

आधी कारखाना, मग नगरपालिका 
निपाणी पालिकेची मुदत 13 सप्टेंबरला तर हालसिध्दनाथ संचालक मंडळाची मुदत 12 ऑक्‍टोबरला संपते. "हालसिध्दनाथ'ची निवडणूक पहिल्यांदा लागेल, त्यानंतर पालिका निवडणुकीचे बिगुल वाजेल, असे सांगण्यात येते. 

बिनविरोध झाल्यास खर्च वाचणार 
हालसिध्दनाथ कारखाना सध्या अर्थिक अडचणीत असल्याने निवडणूक लागली तर पुन्हा कारखान्यावर आर्थिक बोजा पडणार आहे. शेतकऱ्यांसह कारखान्याच्या हितासाठी कदाचित सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णय घेतल्यास कारखान्यावरील खर्च वाचणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com