आचारसंहितेमुळे बेळगाव परिवहन मंडळाला अच्छे दिन

मिलिंद देसाई 
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

बेळगाव - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागु झाल्यापासुन कर न भरता आणि परिवहन मंडळाच्या नियमाचे उल्लंघन करुन प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करुन परिवहन महामंडळाने सात कोटी 44 लाख रुपयांचा कर व दंड वसुल केला आहे त्यामुळे परिवहन मंडळाला अच्छे दिन आले आहेत. 

बेळगाव - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागु झाल्यापासुन कर न भरता आणि परिवहन मंडळाच्या नियमाचे उल्लंघन करुन प्रवास करणाऱ्यांवर कारवाई सुरु झाली आहे. यातून परिवहन महामंडळाने सात कोटी 44 लाख रुपयांचा कर व दंड वसुल केला आहे त्यामुळे परिवहन मंडळाला अच्छे दिन आले आहेत. 

राज्य निवडणुक आयोगाच्या सुचनेनंतर परिवहन महामंडळातर्फे दररोज तपासणीचे काम हाती घेण्यात आले आहे राज्याच्या सीमेवरील चेक पोष्टवर वाहनांची व बसची कसुन तपासणी करण्यात येत आहे. बेळगावसह राज्यातील विविध विभांगामध्ये कारवाई करण्यात आली असुन 27 मार्च ते 16 एप्रिलपर्यंत विविध प्रकारच्या प्रकरणांमध्ये कारवाई करुन, 3 कोटी 12 लाख रुपयांचा दंड व 4 कोटी 31 लाख रुपये कराच्या स्वरुपात वसुल करण्यात आल्या आहेत. यामुळे राज्यातील विविध विभागीय परीवहन महामंडळाला चांगला महसुल उपलब्ध झाला आहे. 

बेळगाव, बंगळुर शहर, बंगळुर ग्रामीण, म्हैसुर, शिमोगा, गुलबर्गा विभागातील राष्ट्रीय व राज्य महामार्ग, जिल्हा व तालुका रस्ते व सीमेवरील चेक पोष्टवर आरटीओ व तपासणी अधिकाऱ्यांनी कारवाई करीत प्रकरण नोंदवुन घेतली आहे काही वाहनेही जप्त करण्यात आली आहेत बंगळुर ग्रामिणमध्ये सर्वाधिक प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. 

12 मेला राज्यात निवडणुक होणार आहे तोपर्यंत मोठया प्रमाणात प्रकरणे दाखल होण्याची शक्‍यता असुन, परिवहन मंडळाला चांगला महसुल उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Belgaum News Karanataka Assembly election