शिवसेना-श्रीराम सेना युतीचे सीमाभागात उमेदवार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

बेळगाव -  शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीला आपला पाठिंबा दर्शवीत शिवसेना सीमाभागात आपला उमेदवार देणार नसल्याचा जाहीर निर्वाळा यापूर्वीच दिला आहे. तरीही जानेवारी महिन्यात पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश केलेल्या श्रीरामसेना प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी सीमाभागावर आपले लक्ष केंद्रित करून श्रीरामसेना-शिवसेना युतीचे उमेदवार निवडणुकीत उतरविण्याचा प्रयत्न चालविला आहे.

बेळगाव -  शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीला आपला पाठिंबा दर्शवीत शिवसेना सीमाभागात आपला उमेदवार देणार नसल्याचा जाहीर निर्वाळा यापूर्वीच दिला आहे. तरीही जानेवारी महिन्यात पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश केलेल्या श्रीरामसेना प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी सीमाभागावर आपले लक्ष केंद्रित करून श्रीरामसेना-शिवसेना युतीचे उमेदवार निवडणुकीत उतरविण्याचा प्रयत्न चालविला आहे. समितीचा बालेकिल्ला असलेल्या बेळगाव दक्षिणमधून स्वतः आपली उमेदवारी जाहीर केली आहे, मात्र शिवसैनिकांमध्ये यामुळे असंतोष निर्माण झाला आहे. 

शिवसेना नेहमीच सीमावासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. सीमाप्रश्‍नासाठी शिवसेनेने हुतात्मे दिले असून आजही बेळगावबाबत शिवसेनेचे स्पष्ट धोरण आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी बेळगाव भेटीवर आलेले शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेना सीमाभागात निवडणूक लढणार नसल्याचा निर्वाळा दिला होता. पण, श्री. मुतालिक यांनी बेळगाववरच आपला निशाणा साधला आहे. बेळगाव दक्षिण, उत्तर, खानापूर, निपाणी येथून श्रीरामसेना-शिवसेना युतीचे उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Belgaum News Karanataka Assembly Election