बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचा उद्या महामोर्चा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

गेल्या आठ दिवसांपासून या मोर्चाची तयारी सुरू असून समिती नेट आणि कार्यकर्त्यांनी सीमाभाग पिंजून काढला आहे.

बेळगाव : मराठी कागदपत्रांसह मास्टरप्लानग्रस्तांना नुकसान भरपाई, शेतकऱ्यांची कर्जमाफी, नो क्रॉपची नोंद हटविणे आदी मागण्यांसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामोर्चा गुरुवारी (ता.25) बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.

सकाळी 11 वाजता धर्मवीर संभाजी चौकातून निघणाऱ्या या मोर्च्यात महाराष्ट्राचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत सहभागी होणार आहेत. गेल्या आठ दिवसांपासून या मोर्चाची तयारी सुरू असून समिती नेट आणि कार्यकर्त्यांनी सीमाभाग पिंजून काढला आहे.

त्यात दोन दिवसांपूर्वी कर्नाटकचे मंत्री रोशन बेग यांनी जय महाराष्ट्र म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधींचे पद रद्द करण्याचा कायदा करण्यात येणार आहे असे वक्तव्य केले होते. त्यामुळे सिमाभागात संताप व्यक्त होत असून या मोर्च्यातही त्याचे प्रतिबिंब दिसण्याची शक्यता आहे.