बेळगावच्या पदवीपूर्व जिल्हाशिक्षणाधिकाऱ्यास लाच घेताना पकडले

मिलिंद देसाई
बुधवार, 11 एप्रिल 2018

बेळगाव - शैक्षणिक जिल्हा पदवीपूर्व जिल्हाशिक्षणाधिकारी एस. डी. कांबळे व कार्यालयीन अधिक्षक एम. बी. होसमठ यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. एसीबीने छापा टाकून बुधवारी ही कारवाई केली. दोघांना 45 हजारांची लाच स्वीकारताना पकडले.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शहरातील एका खासगी पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य  काशिनाथ मळेद यांनी महाविद्यालयात अधिक वर्ग वाढवून देण्यासाठी व वाणिज्य शाखेची मान्यता देण्यासाठी 45 हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याची तक्रार केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.  दोन तासांहून अधिक वेळ एसीबीचे अधिकारी चौकशी करीत आहेत.

एसीबीच्या जाळ्यात शिक्षण खात्याचे अधिकारी अडकल्यामुळे शिक्षण खात्यात खळबळ माजली आहे. शिक्षण खात्यात बोकाळलेला भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. 

Web Title: Belgaum News officer arrested while taking bribe