बेळगाव: सार्वजनिक शौचालयासाठी टमरेल हाती घेऊन आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

बेळगाव : जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी आर. रामचंद्रन यांनी जिल्हात वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालय उभारणीसाठी व्यापक चळवळ हाती घेतलेली असताना संकेश्वर येथील प्रभाग क्रमांक दहामधील महिला आणि पुरुषांनी हाती टमरेल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून सार्वजनिक शौचालय बांधकामाची मागणी केली आहे. अभिनव स्वरूपातील आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत देशात स्वच्छता आणि शौचालय बांधले जात आहेत. जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी रामचंद्रन यांनी गरोदर महिलेला आणि रक्षाबंधांदिनी बहिणीला शौचालय बांधून गिफ्ट देण्याचे कार्यक्रम घेतले. पण, आता हुक्केरी तालुक्यातील प्रभाग क्रमांक दहामधील रहिवशांवर उघड्यावर शौचालयाला जाण्याची परिस्थिती आली आहे. त्यासाठी सार्वजनिक शौचालय बांधण्याचे ठरले. पण, प्रभागातील मतभेत आणि वादमुळे योजना मागे पडत आहे. त्यासाठी प्रभागातील रहिवाशी, नगरसभेचे प्रतिनिधी आणि महिला हाती टमरेल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन आज (शुक्रवार) केले आहे.

'ई सकाळ'वरील महत्त्वाच्या बातम्या : 

देश

पटेल, क्षत्रिय अन्‌ आदिवासी नेतृत्वाचे आव्हान नवी दिल्ली/ अहमदाबाद, ता. 19(यूएनआय) : विकासाच्या कथित राजमार्गावरून "बुलेट'...

07.06 AM

अहमदाबाद: अहमदाबाद येथील पालिकेच्या शाळेतील तिसरीत शिकणाऱ्या आठवर्षीय मुलीवर वर्गशिक्षकानेच वर्गातच बलात्कार केल्याची घटना पुढे...

06.03 AM

श्रीनगर : "रोहिंग्या मुस्लिमांना देशातून हाकलून लावण्याची भाषा करणारे लोक भारतामध्ये राहणाऱ्या तिबेटी सरकारला देश सोडण्यास...

05.03 AM