प्रसंगी बंदी झुगारून बेळगावातील महामेळावा यशस्वी करा - शरद पवार

प्रसंगी बंदी झुगारून बेळगावातील महामेळावा यशस्वी करा - शरद पवार

बेळगाव - कर्नाटकाच्या विधीमंडळ अधिवेशनाविरोधात बेळगावात सोमवारी (ता. 13) आयोजित महामेळाव्याला महाराष्ट्राचे विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री जयंत पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांना कोणत्याही परिस्थितीत उपस्थित राहण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दिली आहे, अशी माहिती महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांनी दिली. 

वादग्रस्त सीमाभाग कर्नाटकाचाच आहे, असे भासविण्यासाठी कर्नाटक सरकारने बेळगावात विधीमंडळ अधिवेशन भरविण्याचा घाट घातला आहे. त्याविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी जनतेचा महामेळावा आयोजित केला आहे. सोमवारी (ता. 13) होणाऱ्या या महामेळाव्यासाठी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रण दिले आहे. पण, सीमाप्रश्‍नी महत्वाचे योगदान दिलेल्या शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे, जयंत पाटील आणि धनंजय महाडिक या नेत्यांना कोणत्याही परिस्थितीत बेळगावात उपस्थित राहून महामेळावा यशस्वी करण्याचा आदेश दिला आहे. 

महामेळाव्याला परवानगी देण्यावरून कर्नाटक सरकार चालढकल करत आहे. पण, अशाच प्रकारे 1986 साली कन्नडसक्‍ती विरोधी आंदोलनात शरद पवार आणि छगन भुजबळ यांनी बंदी झुगारून, वेषांतर करून बेळगावात दाखल झाले होते. ते आंदोलन मोठे गाजले होते. तशाच प्रकारे महामेळाव्याला परवानगी मिळो अथवा न मिळो, सीमावासियांना दिलासा देण्यासाठी प्रसंगी बंदी झुगारून महामेळाव्यात सहभागी होण्याचे आदेश आपल्या पक्षातील नेत्यांना पवार यांनी दिले असल्याचे म. ए. समिती नेत्यांनी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com