मोटारीच्या धडकेत बेळगावचे तीन तरुण ठार

मोटारीच्या धडकेत बेळगावचे तीन तरुण ठार

बेळगाव - सुटीचा दिवस असल्याने फिरायला गेलेल्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या तिघा विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातला. वाहनाला ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या मोटारीची जोरदार धडक बसून तिघे तरुण जागीच ठार झाले. खानापूर रोडवरील प्रभुनगरजवळ आज सकाळी अकरा वाजता ही घटना घडली. तिघेही तरुण 20 वर्षाचे असून एकजण कोनवाळ गल्ली व दोघे वडगाव परिसरातील असल्याची  प्राथमिक माहिती मिळाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शहरातील जैन महाविद्यालयात शिकणारे अथर्व, हर्ष व ऋतिक हे तिघेजण आज सकाळी दुचाकीवरून गणेबैल जवळील भूतनाथ डोंगरावर गेले होते. तिकडून अकराच्या सुमारास ते बेळगावला परतत होते. प्रभु नगर जवळील उतारीला दुचाकी आली असता त्यांच्या समोरून दुसरे वाहन चालले होते. त्याला ओव्हरटेक करून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असताना बेळगावहुन  खानापूरकडे निघालेल्या मोटारीची दुचाकीला जोरदार धडक बसली. यामध्ये दुचाकीवरील तिघेजण रस्त्यावर पडले. या तिघांच्या डोकीला गंभीर इजा झाली. यामध्ये ते जागीच ठार झाले. मोटारीमधील सर्वजण खानापूरकडे मुलगी पाहायला जात असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नारायण स्वामी, पोलीस कॉन्स्टेबल शिरसंगी व अन्य सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या तरुणांची पूर्ण नावे समजू शकली नाहीत. त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. तिन्ही मृतदेह जिल्हा रुग्णालयातील शवागरात हलविण्यात आले आहेत. रीतसर नोंद घेतल्यानंतरच शवविच्छेदन होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com