बेळगावमध्ये भरधाव ट्रकने युवकाला चिरडले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

बेळगाव: सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या तरुणाला भरधाव अवजड ट्रकने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सुकुमार अशोक जिनगोंडा (वय 39, मूळ रा. हिरेहट्टीहोळी, ता. खानापूर, सध्या रा. कॅम्प) असे मृताचे नाव आहे. आज (बुधवार) सकाळी 8.15 वाजता धर्मवीर संभाजी चौकात हा अपघात घडला. यामुळे शहरातून धावणाऱ्या अवजड वाहनांचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

याबाबत वाहतूक दक्षिण विभाग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुकुमार याचे घर धर्मवीर संभाजी चौकाला लागून आहे. तो दररोज सकाळी सातच्या सुमारास फिरण्यासाठी बाहेर पडत होता. आज नेहमीप्रमाणे कॅम्प परिसरातून फिरून तो सव्वा आठच्या सुमारास वनिता विद्यालयाकडून येऊन सर्कलजवळून रस्ता ओलांडत होता. यावेळी चन्नम्मा सर्कलकडून गोगटे सर्कलमार्गे खानापूरकडे अवजड ट्रक (केए-22 बी-9587) भरधाव निघाला होता. सर्कलच्या बाजूला थांबलेल्या सुकुमारचा चालकाला अंदाज आला नाही. त्यामुळे चालत निघालेला सुकुमार थेट ट्रकच्या पुढील चाकाखाली आला. त्यामुळे डोक्‍यावरून चाक जाऊन तो जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच वाहतूक दक्षिण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी, उपनिरीक्षक ए. आर. कांबळे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. ट्रक चालकासह ताब्यात घेतला. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयाच्या शवागारात पाठविण्यात आला.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: belgaum news truck killed youth