अथणी तालुक्यात खेळताना विहिरीत पडून दोन मुलांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

चिक्कोडी - खेळताना विहिरीत पडल्याने बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. 24) कोकटनूर (ता. अथणी) येथे घडली. आदर्श सुभाष तळवार (वय 6) व अभिषेक बसवराज मडिवाळ (वय 5) अशी मृत बालकांची नावे आहेत.

पालकांसमवेत शेतावर गेल्यावर काळाने या दोघांवर घाला घातला.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी, आदर्श तळवार व अभिषेक मडिवाळ ही दोन्ही मुले आपल्या पालकांसोबत गावातील रबकवी वसाहतीत असलेल्या शेतावर गेली होती. पालक शेतात काम करताना ही मुले खेळता खेळता विहिरीत पडली. पोहता येत नसल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाला. 

घटनास्थळी अग्निशमनदलाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. अभिषेक याचा मृतदेह सापडला असून आदर्शचा मृतदेह शोधण्यात येत आहे. ऐगळी पोलिस ठाण्यात प्रकरणाची नोंद झाली आहे. दोन मुलांचा अकाली अंत झाल्याने गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Belgaum News two boys death in Athani Taluka