‘व्हॉट्‌स ॲप’ संदेश द्या, कचरा हटवा

‘व्हॉट्‌स ॲप’ संदेश द्या, कचरा हटवा

चिक्कोडी - सध्या प्रत्येकाचे मोबाईल वापराचे प्रमाण अधिक आहे. त्याचा सदुपयोग करीत सोशल मीडियाचा आधार घेत शहर स्वच्छतेचा नारा चिक्कोडी नगरपालिकेने दिला आहे. नागरिकांनी शहरातील अस्वच्छ अथवा कचरा साचलेल्या जागेचे छायाचित्र काढून स्थळाच्या उल्लेखासह नगरपालिकेच्या व्हॉट्‌स ॲप क्रमांकावर संदेश पाठविल्यास त्वरित तेथील स्वच्छता करण्याचा अनोखा उपक्रम या नगरपालिकेने सुरू केला आहे.

शहरातील स्वच्छतेसाठी पालिका मुख्याधिकारी जगदीश हुलीगेज्जे यांच्या कल्पकतेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी हुलीगेज्जे यांनी ‘क्‍लीन सिटी चिक्कोडी’ असा व्हॉट्‌स ॲप ग्रुप बनविला आहे. त्यात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 

त्यासाठी तीन व्हॉट्‌स ॲप क्रमांक देण्यात आले आहेत. त्यावर नागरिकांनी शहरातील अस्वच्छता असलेल्या ठिकाणाचे छायाचित्र काढून स्थळाचा उल्लेख करून ते पाठविल्यास संदेश संबंधित स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाठविण्यात येतो. त्यानंतर त्यांच्याकडून तातडीने त्या भागातील स्वच्छता करण्यात येते. तसेच स्वच्छ करण्यात आलेले छायाचित्र ग्रुपवर अपलोडही करण्यात येते. या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

स्वच्छतेसाठी या क्रमांकांवर साधा संपर्क
शहरातील स्वच्छतेसाठी पालिकेकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. नागरिकांनी अस्वच्छतेबाबत जगदीश हुलीगेज्जे-९६११९५६५४६, पी. बी. देवमाने-९१४१८११०७१ अथवा प्रियांका विनायक - ९४४९०६७३१३ या क्रमांकांवर अस्वच्छतेबाबतचे छायाचित्र अपलोड करून स्थळाचा उल्लेख करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कचरा न पडणाऱ्या बॅरेलची व्यवस्था
पूर्वी शहरात कचरा टाकण्यासाठी ठेवलेली बॅरेल जनावरे ढकलत असल्याने खाली पडत. त्यामुळे साचलेला कचरा खाली पडल्याने तो पुन्हा भरून उचलावा लागत असे. पालिकेने आता जनावरांच्या धक्‍क्‍याने खाली पडणार नाहीत, अशी व्यवस्था करून बॅरेल ठेवले आहेत. शहरात प्रायोगिक तत्त्वावर ९ ठिकाणी ही बॅरेल आहेत. 

सोशल मीडियाचा सदुपयोग करीत ‘क्‍लीन सिटी चिक्कोडी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याच्या यशस्वीतेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे. शहरात ९ ठिकाणी कचरा टाकण्यासाठी सुरक्षित बॅरेल उभारण्यात आले असून पुढील काळात आणखी काही ठिकाणी अशी बॅरेल ठेवण्यात येणार आहेत.
- जगदीश हुलीगेज्जे, 
पालिका मुख्याधिकारी
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com