डासाची तक्रार केली म्हणून विमानातून काढले बाहेर 

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 एप्रिल 2018

सौरभ राय हे ह्रदयरोगतज्ज्ञ आहेत. ते लखनौपासून बंगळूरु या मार्गावरून 6 ई 541 या विमानाने प्रवास करत होते. विमानाने उड्डाण केल्यानंतर प्रवासादरम्यान सौरभ राय यांनी विमानातील डासांबाबत तक्रार केली.

नवी दिल्ली : बंगळूरु येथील एका डॉक्टरने इंडिगो विमानात डास असल्याची तक्रार केली. या तक्रारीनंतर संबंधित प्रवाशाला विमानातील कर्मचाऱ्यांनी विमानातून बाहेर काढले. मात्र, विमान कंपनी व्यवस्थापनाने त्या प्रवाशाचा 'गैरवर्तन' आणि 'हायजॅक' हा शब्द वापरल्याने विमानातून बाहेर काढण्यात आल्याचे सांगितले.

mosquito

सौरभ राय हे ह्रदयरोगतज्ज्ञ आहेत. ते लखनौपासून बंगळूरु या मार्गावरून 6 ई 541 या विमानाने प्रवास करत होते. विमानाने उड्डाण केल्यानंतर प्रवासादरम्यान सौरभ राय यांनी विमानातील डासांबाबत तक्रार केली. त्यानंतर केबिन क्रूने त्यांना याबाबत सांगण्याचा प्रयत्न केला असता राय हे अधिक आक्रमक झाले आणि त्याने अपशब्द वापरणे सुरु केले, असे इंडिगो या विमान कंपनीने ट्विटरवरून सांगितले. तसेच जेव्हा विमानाचा बाहेर जाण्याचा मार्ग बंद करण्यात आल्याने संतप्त झालेल्या राय हे 'हायजॅक' म्हणून ओरडू लागले. सुरक्षाविषयक पर्यायांचा विचार केला असता 'पायलट-इन-कमांड'ने त्यांना विमानातून उतरविण्याचा निर्णय घेतला, असे इंडिगो विमान कंपनीने सांगितले.

''लखनौ ते बंगळूरू यादरम्यान जाणाऱ्या या विमानात मोठ्या प्रमाणात डास होते. त्यामुळे आम्ही याचा विरोध केला. मला इंडिगो विमानात चांगली वर्तवणूक मिळाली नाही''. असे डॉ. राय यांनी 'एएनआय'शी बोलताना सांगितले.   

Web Title: Bengaluru Doctor Complained About Mosquitoes Removed From IndiGo Flight

टॅग्स