कृष्णा ,विल्सन यांना रेमन मॅगसेसे पुरस्कार

वृत्तसंस्था
सोमवार, 1 ऑगस्ट 2016

नवी दिल्ली - दाक्षिणात्य गायक टी. एम. कृष्णा आणि समाजसेवक बेझवाडा विल्सन यांना यंदाचा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा रेमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे.

आज (बुधवार) रेमन मॅगसेसे पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये या दोघांची नावे आहेत. कृष्णा हे दाक्षिणात्य गायक असून, त्यांनी आपल्या गायनामधून सामाजिक सलोखा जपला आहे. कृष्णा यांनी भारतीय संस्कृतीची ओळख आपल्या गायनामधून करून देत, दलित व इतर वर्गाच्या समुदायाला संगीताची ओळख करुन दिली.

बेझवाडा विल्सन हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय आंदोलन केले होते. मानवी हक्क मिळवून देण्यासाठी ते लढत आहेत.