भारतात धावली पहिली खासगी ट्रेन; 'भारत गौरव योजने'बद्दल माहितीये?

कोईम्बतूर ते शिर्डी या मार्गावर भारत गौरव योजनेंतर्गत भारतातील पहिली खासगी रेल्वे धावली आहे.
Bharat Gaurav Train
Bharat Gaurav TrainSakal

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागाने भारत गौरव योजनेंतर्गत धावणाऱ्या पहिल्या खासगी रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवला. कोईम्बतूर ते शिर्डी या मार्गावर भारत गौरव योजनेच्या अंतर्गत भारतातील पहिली खासगी रेल्वे धावली आहे. भारत गौरव योजनेच्या पहिल्या खासगी ट्रेनचा प्रवास १४ जून रोजी सायंकाळी ६ वाजता उत्तर कोईम्बतूर येथून चालू झाला होता आणि १६ जून रोजी सकाळी साडेसात वाजता ही ट्रेन साईनगर शिर्डी येथे पोहोचली असं रेल्वे मंत्रालयाने सांगितलं.

(Bharat Gaurav Scheme First Private Train)

भारताच्या रेल्वे मंत्रालयाने नोव्हेंबरमध्ये भारत गौरव योजना जाहीर केली होती. या योजनेतून खासगी कंत्राटदारांना रेल्वे भाड्याने घेता येणार आहे. याच योजनेंतर्गत 'साऊथ स्टार रेल' यांनी भारत गौरवची पहिली रेल्वे चालवली आहे. दरम्यान 'साउथ स्टार रेल' ही भारत गौरव ट्रेन चालवणारी पहिली नोंदणीकृत कंपनी ठरली आहे.

भारत गौरव योजनेच्या अंतर्गत सेवा देण्यासाठी या खासगी कंपनीने २० डब्याच्या गाडीसाठी दक्षिण रेल्वेला सुरक्षा ठेव म्हणून 1 कोटी रुपये दिले आहेत. त्याशिवाय वार्षिक दर म्हणून २७.७९ आणि स्थिर दर म्हणून ७६.७७ लाख रूपये दक्षिण रेल्वेला दिले आहेत. दरम्यान सध्याच्या एका फेरीसाठी ३८.२२ लाख रूपयांची रक्कम कंपनीने जमा केली असल्याचं रेल्वे मंत्रालयाने सांगितलंय.

Bharat Gaurav Train
रूपाली चाकणकरांविरोधात आक्षेपार्ह कमेंट करणं भोवलं; तरूणाला अटक

भारत गौरव योजना काय आहे?

भारत गौरव योजनेनुसार, कोणताही कंत्राटदाराला किंवा व्यक्तीला भारतीय रेल्वे भाड्याने घेता येणार आहेत. पर्यटन पॅकेज किंवा इतर सेवेसाठी भारतीय रेल्वेकडून किमान दोन वर्षासाठी भाड्याने घेता येणार आहे. दरम्यान सेवा देणाऱ्या खासगी कंपनीला मार्ग, थांबे, प्रदान केलेल्या सेवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दर ठरवण्याचे स्वातंत्र्य असल्याचं मंत्रालयाने सांगितलं आहे.

दरम्यान ट्रेन चालवण्यासाठी रेल्वे विभाग कर्मचारी, गार्ड आणि डब्यांसाठी बोर्डवरील देखभाल करणारे कर्मचारी प्रदान करेल. तसेच हाउसकीपिंग आणि केटरिंग व्यवस्था ज्या त्या खासगी कंपन्याकडून राबवण्यात येणार असल्याचं मंत्रालयाने सांगितलं आहे.

Bharat Gaurav Train
मुंबईत 40 लाखांचे ड्रग NCBकडून जप्त; दोघांना अटक

या योजनेमधील गाड्यांना एक फर्स्ट एसी कोच, तीन 2 टायर एसी कोच आणि आठ 3-टायर कोच आणि पाच स्लीपर क्लास कोच आहेत. दरम्यान रेल्वे पोलिस दलासह खाजगी सुरक्षेसह कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत उपस्थित राहण्यासाठी एक डॉक्टर देखील असणार आहे.

“नोंदणीकृत सेवा कंपन्यांनी डब्यांच्या आतील भागांचे नूतनीकरण केले आहे आणि प्रवाशांना आरोग्यदायी अनुभव देण्यासाठी सर्व डब्यांमध्ये चोवीस तास सफाई कर्मचारी आणि सेवा व्यावसायिकांची संपूर्ण टीम लावली आहे. भक्तिगीते आणि गाणे वाजवण्यासाठी सर्व डब्यांमध्ये सेवा सुरू करण्यात आली आहे. दरम्यान ही कंपनी कोइम्बतूर ते शिर्डी आणि परत जाण्यासाठी वाहतूक, व्हीआयपी दर्शन, बस व्यवस्था, वातानुकूलित राहण्याची सुविधा आणि टूर गाइडद्वारे सुविधा समाविष्ट असलेले पॅकेज देते." असं मंत्रालयाने सांगितलं.

Bharat Gaurav Train
भाजपकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू; 'मिशन 48'ची घोषणा

भारत गौरव योजने अंतर्गत भारतीय रेल्वे मंत्रालयाने ३ हजार ३३ डबे निर्धारित केले आहेत. ते भाड्याने घेण्यासाठी कोणीही रेल्वेशी संपर्क करू शकतो. दरम्यान खासगी कंत्राटदाराला परवडत असेल तर तो भारतीय रेल्वे उत्पादन युनिट्सकडून रेक खरेदी करून ते चालवू शकणार असल्याचंही स्पष्टीकरण रेल्वे मंत्रालयाने दिलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com