मध्य प्रदेशात शिक्षक विकणार कांदे

वृत्तसंस्था
सोमवार, 19 जून 2017

जिल्हा प्रशासनाचा अजब फतवा

जिल्हा प्रशासनाचा अजब फतवा

भोपाळ: राजगड जिल्हा प्रशासनाने असा अजब फतवा काढला आहे की, सरकारी शाळांमधील शिक्षक विद्यार्थ्यांना शिकविण्याऐवजी कांद्याची विक्री करताना दिसणार आहेत. शेतकरी आंदोलन व कांद्याचे घसरलेले दर पाहता थेट शेतकऱ्यांकडून कांद्याची खरेदी करून तो सवलतीच्या दरात माध्यान्ह भोजनाची कंत्राटे घेतलेल्यांना विकावा, असा आदेश जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिला आहे.
याबाबत प्रशासनाकडून एक पत्रकही जारी करण्यात आले आहे. त्यानुसार, नागरी पुरवठा विभागाने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला कांदा विविध ठिकाणी असलेल्या जनशिक्षा केंद्रांवर पाठवायचा आहे. तेथे नियुक्त असलेल्या शिक्षकांनी तो माध्यान्ह भोजनाचे कंत्राट असलेल्या समूहांना व संबंधितांना विकावा लागणार आहे, असे आदेश आहेत. नागरी पुरवठा विभागाकडून घेतलेल्या कांद्याची रीतसर पावतीही संबंधित शिक्षकांना सादर करावी लागणार आहे.

स्वच्छ भारत अभियानाविषयी जनजागृती, जनगणना अशा कामांपाठोपाठ आता येथील शिक्षकांना कांद्याची विक्री करण्यास जुंपल्याने साहजिकच त्यांच्यातून नाराजीचा सूर उमटत आहे. विद्यार्थ्यांना शिकवण्यावर लक्ष केंद्रित करायचे की कांदे विकायचे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, राज्यात उत्पादित मालाचे घसरलेले दर व डोक्‍यावर असलेला कर्जाचा डोंगर यामुळे गेल्या दोन आठवड्यांत चौदा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.

शेतकऱ्यांसाठी संधी
या निर्णयामुळे शेतकऱ्यांना उत्पादित कांद्याची विक्री करण्याची एक चांगली संधी उपलब्ध होणार आहे. सरकारने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला कांदा सडण्याऐवजी तो माफक दरात माध्यान्ह भोजनाचे कंत्राट असलेल्या एनजीओंना विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने काढलेल्या पत्रकात नमूद आहे.

देश

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते धरणाचे उद्घाटन होण्यापूर्वीच तब्बल 389 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले...

01.45 PM

श्रीनगर : भारत पाकिस्तान दरम्यानच्या सीमेलगत अमृतसरनजीक अंजाला सेक्टर येथे घुसखोरीचा डाव सीमा सुरक्षा बलाने (BSF) उधळून लावला....

12.06 PM

पटेल, क्षत्रिय अन्‌ आदिवासी नेतृत्वाचे आव्हान नवी दिल्ली/ अहमदाबाद, ता. 19(यूएनआय) : विकासाच्या कथित राजमार्गावरून "बुलेट'...

07.06 AM