ओडिशामध्ये मॉन्सूनचे आगमन

वृत्तसंस्था
सोमवार, 12 जून 2017

भुवनेश्‍वर: ओडिशामध्ये मॉन्सूनचे आज आगमन झाले असून राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. नैर्ऋत्य मोसमी पावसाचे आज ओडिशामध्ये आगमन झाले तर किनारपट्टीकडील जिल्ह्यात तो स्थिरावला असल्याचे भुवनेश्‍वरच्या हवामान खात्याचे संचालक डॉ. सरतचंद्र साहू यांनी सांगितले.

मॉन्सूनचे राज्याच्या जगस्तीपूर, केंद्रपाडा, भंड्रक आरि बालासोर या भागात स्थिरावला असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याच्या अन्य भागातही तो लवकरच पोचेल असे सांगत हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. बालासोर, भद्रक, केंद्रपाडा, मयूरभंज, धेनकनल, अनगुल आणि जजपूर येथे आगामी 24 तासांत मुसळधार पावसाची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.