भुतांमुळे शेतकरी आत्महत्या करतात- भूपेंद्र सिंह

रॉयटर्स
बुधवार, 20 जुलै 2016

भोपाळ (मध्यप्रदेश)- पिक समाधानकारक न आल्यामुळे नाही तर भूत व प्रेतांमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत, असा दावा गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांनी आज (बुधवार) विधानसभेत केला.

मध्यप्रदेशात विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विधानसभेत कॉंग्रेसचे आमदार शैलेंद्र पटेल यांनी शेतकरी आत्महत्येबाबत प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना भूपेंद्र सिंह म्हणाले, ‘पिक समाधानकारक न आल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत नाहीत तर भूत व प्रेतांमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत.‘

भूपेंद्र सिंह यांच्या उत्तरानंतर विधानसभेत आमदारांनी मोठा गोंधळ सुरू केला. गृहमंत्र्यांच्या उत्तरानंतर आमदार राजेंद्र पांडे म्हणाले, सरकार भूत व प्रेतांवर विश्वास ठेवत आहे काय? यावर भूपेंद्र सिंह म्हणाले, मध्यप्रदेशातील काही ग्रामिण भागात भूत उतरविले जाते. मात्र, समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे आमदारांना गोंधळ सुरूच ठेवला. अखेर, विधानसभा अध्यक्षांना काही काळासाठी कामकाज स्थगित केले.

Web Title: Bhupendra sinh

व्हिडीओ गॅलरी