केंद्रीयमंत्री म्हणतात, देशात बलात्काराच्या एक-दोन घटना होणारच

वृत्तसंस्था
रविवार, 22 एप्रिल 2018

बलात्कारासारख्या घटना कधी-कधी रोखता येत नाही. तरीही सरकार प्रत्येक ठिकाणी तत्परतेने सक्रिय असून, अत्यंत योग्य पद्धतीने सरकार काम करत आहे. भारतासारख्या मोठ्या देशात बलात्काराच्या एक-दोन घटना घडतच असतात. ही काही मोठी गोष्ट नाही.

- संतोष गंगवार, कॅबिनेट मंत्री

नवी दिल्ली : देशात वाढत चाललेल्या बलात्काराच्या घटनांना लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारकडून कडक पावले उचलण्यात येत आहेत. यासाठी सरकारकडून कडक कायदे आणण्याचा प्रयत्न केला जात असताना दुसरीकडे मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले संतोष गंगवार यांनी याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. ते म्हणाले, ''भारतासारख्या मोठ्या देशात बलात्काराच्या एक-दोन घटना होत असतात, ही काही मोठी गोष्ट नाही''.

Union minister Santosh Gangwar

उत्तरप्रदेश येथील बरेलीत गंगवार पत्रकारांशी संवाद साधत होते. ते म्हणाले, बलात्कारासारख्या घटना कधी-कधी रोखता येत नाही. तरीही सरकार प्रत्येक ठिकाणी तत्परतेने सक्रिय असून, अत्यंत योग्य पद्धतीने सरकार काम करत आहे. भारतासारख्या मोठ्या देशात बलात्काराच्या एक-दोन घटना घडतच असतात. ही काही मोठी गोष्ट नाही.

मागील काही दिवसांपासून कठुआ आणि उन्नाव येथे झालेल्या बलात्काराच्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ विविध ठिकाणी आंदोलने केली जात आहेत. या मुद्यावर सरकार अत्यंत गंभीर असून, सरकारकडून कडक पावले उचलली जात आहेत. मात्र, भाजपच्याच केंद्रीय मंत्र्याने हे विधान केल्याने त्यांच्या या वादग्रस्त विधानावरून नवा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.

Web Title: In a big country like India 1 or 2 rape cases should not be hyped says Union minister Santosh Gangwar