बिहारमधील पूरग्रस्तांसाठी 500 कोटींची मदत

वृत्तसंस्था
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे बिहारमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामध्ये एकूण 418 बळी गेले आहेत. तर 19 जिल्ह्यांमधील 1 कोटी 67 लाख नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. या पुरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पाटणा - बिहारमध्ये पुराच्या पाण्याने थैमान घातले असून, शेकडो नागरिकांचा बळी गेला आहे. आज (शनिवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूरस्थितीची पाहणी करत बिहारसाठी 500 कोटी रुपयांची मदत जाहीर केली.

पंतप्रधानांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह पुरस्थितीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पूरग्रस्तांना सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले. पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मदतीचे रक्कम आणखी वाढविणार असल्याचेही सांगितले. पूरग्रस्तांचे तात्काळ स्थलांतर करण्यासही त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. 