पुढच्या निवडणुकीतही मोदींना पर्याय नाही: नितीशकुमार

उज्ज्वलकुमार
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

पाटणा : लालूप्रसाद यादव यांच्याशी फारकत घेऊन भाजपच्या साथीत नवे सरकार स्थापन करणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. 2019च्या लोकसभा निवडणुकीतही मोदी यांना पर्याय नाही. कारण, त्यांच्यासारखी क्षमता कुणामध्येच दिसत नसल्याचे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.

अलीकडच्या नाट्यमय घडामोडींनंतर नितीशकुमार यांनी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, लालूप्रसाद जातीचे नेते आहेत आणि मी समाजाचा. समाजातील सर्व लोकांना बरोबर घेऊन चालले पाहिजे, असा माझा प्रयत्न असतो. मात्र, अन्य काही लोक असा विचार करत नाहीत.

भ्रष्टाचाराच्या प्रकरणात धर्मनिरपेक्षतेचा ढालीप्रमाणे वापर करण्याची परवानगी कोणालाही दिली जाऊ शकत नाही. तुम्ही भ्रष्टाचार करणार आणि घराणेशाहीला चालना देणार. हे सर्व धर्मनिरपेक्षतेच्या नावावर कसे चालेल? चादर ओढून तुम्ही भ्रष्टाचार कराल आणि धर्मनिरपेक्षतेची चर्चाही कराल, तर कसे चालेल, असे टीकास्त्रही नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यांच्यावर सोडले.

ज्या दिवशी लालूप्रसाद यांच्या निवासस्थानी केंद्रीय अन्वेषण विभागाचा (सीबीआय) छापा पडला, त्याच दिवशी लालूप्रसाद यांनी नवीन सहकारी एकत्र आल्याविषयी ट्विट केले होते. 40 मिनिटांनंतर ते हटविण्यातही आले होते, असे सांगून नितीशकुमार म्हणाले, भ्रष्टाचाराच्या प्रकरणात कोणतेही स्पष्टीकरण दिले गेले नाही आणि हा विषय केवळ टाळण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यामुळे सरकारच्या कारभाराविषयी प्रश्‍न उपस्थित होत होते. भाजपशी आघाडीविषयी वरिष्ठ नेतृत्वाकडून प्रस्ताव आला होता. पंतप्रधानांनीही ट्विट केले होते. मी खूप काही सहन केले. मात्र, आता हा विषय पुढे जात नव्हता. अशा परिस्थितीत आम्ही वेगळा मार्ग शोधला.

राजदकडून राजीनाम्याची मागणी
मुख्यमंत्री नितीशकुमार हे हत्ये प्रकरणात कलम 302चा सामना करत असल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी राष्ट्रीय जनता दलाने (राजद) केली. पक्षाचे वरिष्ठ नेते जगदानंद सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, नितीशकुमार नैतिकतेच्या गोष्टी करत आहेत. अशा परिस्थितीत सर्वप्रथम त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. नितीश यांनी संधिसाधूपणाची नवी व्याख्या निर्माण केली आहे आणि इतिहास त्यांना याच रूपात लक्षात ठेवेल. त्याशिवाय त्यांनी नेहमीच गुन्हेगारांना आश्रय दिला आहे.