एकाच कुटुंबातील सहा जण गंगा नदीत बुडाले

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

पाटणा : पाटणा जिल्ह्यात मरांची गावात गंगा नदीत आज एकाच कुटुंबातील सहा जण बुडाले. त्यामध्ये चार अल्पवयीन बालकांचा समावेश आहे.

पाटणा : पाटणा जिल्ह्यात मरांची गावात गंगा नदीत आज एकाच कुटुंबातील सहा जण बुडाले. त्यामध्ये चार अल्पवयीन बालकांचा समावेश आहे.

एकाच कुटुंबातील सहा जण गंगा नदीवर अंघोळीसाठी गेले होते. त्यातील एक ते दोन जण हे खोल पाण्यात बुडायला लागले. त्या वेळी कुटुंबातील अन्य सदस्यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, असे पाटणाच्या जिल्हाधिकारी संजय कुमार यांनी सांगितले. सर्वच्या सर्व सहा मृतदेह नदीबाहेर काढण्यात आले आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घटनेबद्दल दु:ख व्यक्त करीत, त्यांनी पीडित कुटुंबीयांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्याशिवाय नितीश कुमार यांनी पाटणाच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून पीडित कुटुंबीयांना आवश्‍यक ती मदत तातडीने पुरविण्याच्या सूचना दिल्या. प्रत्येक मृत व्यक्तीच्या नातेवाइकांना चार लाख रुपये दिले जातील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.