कैरानामध्ये विरोधकांच्या एकजूटीने भाजपची कोंडी

kairana
kairana

लखनऊ : येथील पश्चिम उत्तर प्रदेशातील कैरानामध्ये लोकसभेची पोटनिवडणूक सुरू आहे. या निवडणूकीत सर्व विरोधी पक्षांनी भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपच्या म्रिगांका सिंह यांच्या विरूद्ध राष्ट्रीय लोक दलाचे तबस्सुम हसन निवडणूकीच्या रिंगणात आहेत. तबस्सुम यांना समाजवादी पक्ष, बहूजन समाजवादी पक्ष आणि कॉंग्रेस यांनी पाठींबा दिला आहे. 


देशभरात लोकसभेच्या 4 आणि विधानसभेच्या 10 जागांसाठी पोटनिवडणूक सुरू आहे. त्यापैकी कैरानामध्ये भाजप विरूद्ध इतर सर्व अशी लढत सुरू आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी ही जागा राखने प्रतिष्ठेचे झाले आहे. यापुर्वी गोरखपूर आणि फुलपूर या दोन मतदार संघात झालेल्या पोटनिवडणूकीत भाजपला अपयश आले होते. भाजपचे हुकुम सिंह यांच्या निधनामुळे कैरानामधील पोटनिवडणूक होत आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री ए. डी. कुमारस्वारी यांच्या शपथविधी सोहळ्याला बहूजन समाज पक्षाच्या मायावती, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, कॉंग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, अध्यक्ष राहूल गांधी यांनी एकाच व्यासपीठावर हजेरी लावली होती. त्यातूनच पुढील काळात होणाऱ्या निवडणूकांमध्ये सर्वपक्ष मिळून भाजपच्या विरोधात एकत्र येण्याचे संकेत मिळाले होते. त्याचाच अनूभव कैरानामध्ये होत असलेल्या पोटनिवडणूकीत पहायला मिळत आहे. विरोधकांनी दाखवलेली एकजूट आगामी लोकसभा निवडणूकीत भाजपासाठी किती अडचणीची ठरते, हे कैरानामध्ये स्पष्ट होईल. त्यामुळेच या पोटनिवडणूकीचे महत्त्व अधिक आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com