भाजप तोडतंय, आपल्याला जोडायचंय : राहुल गांधी

Rahul Gandhi
Rahul Gandhi

नवी दिल्ली - तुम्ही सगळे काँग्रेस कार्यकर्ते माझे कुटुंब आहात. तरुणांनो एकत्र या, आपण एकतेचे आणि प्रेमाचं राजकारण करू. पुढील काळात काँग्रेस सर्वांत जुना आणि तरुण पक्ष असेल (ग्रँड ओल्ड यंग पार्टी), असे आवाहन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले.

काँग्रेसमध्ये दोन दशकांपासून सुरू असलेले सोनिया युग आज (शनिवार) समाप्त झाले असून, आजपासून राहुलपर्वाला सुरवात झाली. राहुल गांधी हे काँग्रेसच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले आहेत. काँग्रेस मुख्यालयात आज सकाळी झालेल्या सोहळ्यामध्ये राहुल गांधी पक्षाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. या कार्यक्रमाला देशभरातून काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

राहुल गांधी म्हणाले, की भाजपच्या लोकांना समजावण्याचे प्रयत्न करत आहोत, की तुम्ही देशात आग लावू नका. एकदा आग लागली की नियंत्रणात आणणे अवघड असते. भाजपवाले तोडण्याचे काम करतात, आम्ही जोडण्याचे काम करतो. हिंसेमुळे देशाच्या एकतेला धोका बसत आहे. तुमचा आवाज दाबण्यासाठी सरकार कोणत्यागी थराला जाईल. तुम्ही सगळे काँग्रेस कार्यकर्ते माझे कुटुंब आहात. तरुणांनो एकत्र या, आपण एकतेचे आणि प्रेमाचं राजकारण करू. पुढील काळात काँग्रेस सर्वांत जुना आणि तरुण पक्ष असेल. आज खाण्याच्या सवयींवरून देशात हत्या होत आहेत. सध्या सुरु असलेल्या क्रोधाच्या राजकारणाविरोधात आपल्याला लढायचे आहे. त्यांचे द्वेषाचे राजकारणच आपल्याला मजबूत बनवत आहे. देशात आधी लोकांच्या हितासाठी राजकारण केले जात होते. गरिबांबाबत बोलले की आज लक्ष्य केले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com