गोव्यात काँग्रेसच्या दाव्यानंतर अमित शहा सतर्क

BJP chief Amit Shah to hold key meet on Goa today after Congress seeks no trust vote
BJP chief Amit Shah to hold key meet on Goa today after Congress seeks no trust vote

नवी दिल्ली : गोव्यात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यासाठी काँग्रेसकडून दबाव वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अमित शहा सतर्क झाले असून, त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची राजधानी दिल्लीत बैठक बोलावली आहे.

मनोहर पर्रीकर यांना दिल्लीतील 'एम्स'मध्ये दाखल करण्यात आले आहे. पर्रीकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर गोव्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, गोवा भाजप प्रदेशाध्यांनी मुख्यमंत्री बदलाची शक्यता नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाले. मात्र, काँग्रेसकडून मुख्यमंत्री बदलाबाबत दबाव वाढत आहे. तसेच यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन घेण्याची जोरदार मागणी केली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर अमित शहांनी बोलावलेल्या बैठकीपूर्वी पक्षाचे सरचिटणीस (संघटन) राम लाल आणि बी. एल. संतोष यांनी गोव्यातील भाजपच्या आमदारांची भेट घेतली.

दरम्यान, गोव्यात काँग्रेसकडे भाजपपेक्षा जास्त आमदारांचे संख्याबळ आहे. मात्र, भाजपने या राज्यात सरकार स्थापन केले आहे. त्यानंतर आता भाजपने वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली आहे. भाजपने बोलावलेल्या या बैठकीकडे गोव्यातील राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com