लालूंवर कारवाईची भाजपची मागणी

यूएनआय
शनिवार, 6 मे 2017

नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे कुख्यात गुंड राजकारणी महंमद शहाबुद्दीनसोबतच्या दूरध्वनीवरील संभाषणावरून भाजपने टीकेची झोड उठविली आहे.

मुख्यमंत्री नितीशकुमार लालूप्रसाद यादव यांच्यावर कारवाई करणार का, असा सवाल भाजपने केला आहे. 

लालूंसारख्या मोठ्या नेत्याने एखाद्या गुंडासोबत अशा पद्धतीने संवाद साधणे, हा घटनात्मक चौकटीचा भंग आहे. लालूप्रसाद हे संयुक्त जनता दल आणि राष्ट्रीय जनता दल या आघाडीचे बडे नेते असून, त्यांची दोन मुले मंत्री आहेत. त्यातील एक तर उपमुख्यमंत्री आहे, असे भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.

तत्पूर्वी एका खासगी वृत्तवाहिनीने स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून लालू आणि शहाबुद्दीन यांच्यातील संभाषण उघड केले होते. महंमद शहाबुद्दीनसारखा गुंड तुरुंगामध्ये मोबाईल कसा काय नेऊ शकतो; तसेच लालूंसारखा मोठा राजकारणी त्याचा फोन घेतो, हा दुहेरी गुन्हा असल्याचे प्रसाद यांनी नमूद केले.

Web Title: BJP demands to act strongly against Lalu Prasad Yadav