अखेर यशवंत सिन्हांचा भाजपला 'रामराम'

वृत्तसंस्था
शनिवार, 21 एप्रिल 2018

गेल्या अनेक महिन्यांपासून यशवंत सिन्हा पक्षनेतृत्वावर नाराज होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी घेतलेल्या बहुतांश निर्णयावर यशवंत सिन्हा यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आज त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी आज अखेर पक्षाला रामराम ठोकला. गेल्या अनेक महिन्यांपासून यशवंत सिन्हा पक्षनेतृत्वावर नाराज होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी घेतलेल्या बहुतांश निर्णयावर यशवंत सिन्हा यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आज त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तसेच यशवंत सिन्हा यांनी 'राष्ट्र विचार मंच' या नव्या पक्षाची स्थापना केली.

yashwant sinha

पंतप्रधान मोदींनी नोटाबंदी आणि जीएसटी यांसारखे निर्णय घेतले होते. त्यांच्या या निर्णयावर यशवंत सिन्हा यांनी सातत्याने टीका केली होती. तसेच यशवंत सिन्हा यांनी 30 जानेवारीला 'राष्ट्र मंच' या नव्या संघटनेची स्थापना केली होती. ''माझी ही संघटना बिगर राजकीय असून, केंद्र सरकारकडून जनतेच्या विरोधात जे निर्णय घेतले जातील, त्याचा माझ्याकडून विरोध केला जाणार आहे'', असे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. यशवंत सिन्हा यांनी शनिवार रात्री विरोधी पक्षांच्या नेत्यांशी भेट घेतली होती. त्यानंतर सिन्हा यांनी या निर्णय घेतला. 

दरम्यान, यापूर्वी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या कार्यपद्धतीवर टीका करणारे भाजपचे खासदार नाना पटोले यांनी पक्षाला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता यशवंत सिन्हा यांनी भाजपला रामराम ठोकला आहे.  

Web Title: BJP Leader Yashwant Sinha Exist From Party And Formed New Party