भाजपचा रोजगारयुक्त व आश्‍वासनपूर्ती जाहीरनामा

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जानेवारी 2017

पणजी : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आज रोजगारवृद्धीसाठी अनेक आश्‍वासने देणारा जाहीरनामा प्रसिद्ध केला. गोवा
राज्य रोजगारयुक्त व बेरोजगारीमुक्त, विकासाभिमुख, तसेच सरकारी खात्यांतील कंत्राटी कामगारांना नियमित सेवेत व कंत्राटी मजुरांना सवलती देण्याची आश्‍वासने यामध्ये आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्याचे प्रकाशन झाले. या वेळी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसूझा उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री पार्सेकर यांनी जाहीरनाम्यातील ठळक वैशिष्ट्यांबाबत माहिती दिली. ते म्हणाले, की राज्यात अधिकाधिक रोजगारनिर्मिती करण्यावर भर देण्यात येणार आहे. तरुणांना कुशल व व्यावसायिक प्रशिक्षण देऊन खासगी क्षेत्र व मोपा प्रकल्पामध्ये रोजगार देणे, राज्यात गुंतवणूक करणाऱ्यांना प्रोत्साहन देणे व जागतिक दर्जाचा विकास याकडे लक्ष देण्याचे ठरविले आहे. मुख्यमंत्री योजनेत सुधारणा करून त्यासाठी निधी उपलब्ध करणे, रेती व चिरेखाणी व्यावसाय नियमित करण्यासाठी धोरण तयार करणे, तसेच पर्यटनाला उद्योगाचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असे पार्सेकर यांनी सांगितले. कॅसिनो, शिक्षण भाषा माध्यम, खाण गैरव्यवहारासंदर्भात कारवाई व प्रादेशिक आराखड्यासंदर्भात मागील निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनांना या निवडणूक जाहीरनाम्यातून बगल देण्यात आली आहे.