भाजप म्हणजे भारतीय जुमला पार्टी: मायावती

वृत्तसंस्था
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

फैजाबाद (उत्तर प्रदेश) - भारतीय जनता पक्षावर टीका करण्याचे सत्र सुरूच ठेवत बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी भाजप म्हणजे भारतीय जुमला पार्टी असल्याची टीका केली आहे.

फैजाबाद (उत्तर प्रदेश) - भारतीय जनता पक्षावर टीका करण्याचे सत्र सुरूच ठेवत बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी भाजप म्हणजे भारतीय जुमला पार्टी असल्याची टीका केली आहे.

येथील एका निवडणूक प्रचारसभेत मायावती बोलत होत्या. त्या म्हणाल्या, "जर भाजप सत्तेत आला तर सर्व प्रकारची आरक्षणे बंद होतील. मला त्याबाबत सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. जर भाजप सत्तेत आला, तर विचार करा येथे रोहित वेमुलासारखी किती प्रकरणे होतील.' मंगळवारीही गोंदा येथील एका जाहीरसभेत बोलताना मायावती यांनी मोदींवर निशाणा साधला होता. "भाजपला अल्पसंख्यांकांची चिंता नाही. जर राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपने सरकार स्थापन केले, तर सर्व प्रकारची आरक्षणे रद्द करण्यात येतील किंवा असलेली आरक्षणे निष्क्रिय केली जातील', अशा शब्दांत त्यांनी टीका केली.

दरम्यान, उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या आघाडीबद्दल समाजवादी पक्षात नाराजीचे चित्र असल्याचे दिसत आहे. "मी कोणत्याही काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही. जर मला नेताजींनी सांगितले की काँग्रेसविरुद्ध लढणाऱ्या समाजवादी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करा, तर तो मी करेल', अशा प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे नेते शिवपाल यादव यांनी व्यक्त केल्या आहेत.

Web Title: BJP means Bhartiya Jumla Party : Mayawati