थांबू नका! मुले जन्माला घाला: भाजप आमदार

Vikram Saini
Vikram Saini

मुझफ्फरनगर : हिंदू धर्माच्या रक्षणासाठी अधिकाधिक मुलांना जन्म देण्याचे सल्ले भाजप नेते सतत देत असताना आता यामध्ये आणखी एका भाजप नेत्याचे नाव सहभागी झाले आहे. मुझफ्फरनगरचे भाजपचे आमदार विक्रम सैनी यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी जोपर्यंत कायदा होत नाही, तोपर्यंत मुलांना जन्म द्यायला थांबू नका असे म्हटले आहे. 

लोकसंख्या नियंत्रण नियमांची खिल्ली उडवत सैनी यांनी 'हम दो, हमारे १८', आणि 'हम ५, हमारे २५', अशी नवी घोषणा केली आहे. लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रमातच त्यांनी हा सल्ला दिला आहे. विक्रम सैनी यांनी हिंदूंनी लोकसंख्या वाढीसाठी प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे असे सांगितले. 

सैनी म्हणाले, की सरकारकडून 'हम दो, हमारा एक' अशी घोषणा करण्यात आल्यानंतर हिंदू समाजातील अनेक जण इथेच अडकले. परंतु, आता हम दो, हमारे १८, हम ५, हमारे २५ असं म्हणण्याची वेळ आली आहे. हा देश सर्वांसाठी समान असेल तर कायदाही सर्वांसाठी समान असायला हवा. जोपर्यंत लोकसंख्या नियंत्रणविषयी सर्वांना समान कायदा बनत नाही, तोपर्यंत हिंदूंनी थांबायचं नाही. कायदा बनेल तो सर्वांसाठी. तोपर्यंत थांबू नका. दोन मुले झाल्यानंतर माझी पत्नी मला म्हणाली होती आता तिसरे नको. परंतु मी तिला म्हणालो अजून चार-पाच होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com