मेरठमध्ये भाजप आमदाराच्या भावास अटक

वृत्तसंस्था
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

मेरठ- भाजपचे वादग्रस्त आमदार संगीत सोम यांचे भाऊ गगन सोम यांनी विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी मतदान करताना पिस्तूल जवळ बागळल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

मेरठ- भाजपचे वादग्रस्त आमदार संगीत सोम यांचे भाऊ गगन सोम यांनी विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी मतदान करताना पिस्तूल जवळ बागळल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

गगन हे आज सकाळी सरढाणा मतदारसंघातील मतदान केंद्रावर नऊच्यादरम्यान पोचले. तेथील सुरक्षारक्षकाने तपासणी केली असता त्यांच्याकडे पिस्तूल आढळले. त्यांना तत्काळ ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. ज्यांच्याकडे परवाना असलेले शस्त्र आहे, त्यांनी पोलिसांकडे जमा करणे निवडणूक आचारसंहितेनुसार बंधनकारक आहे. काही विशिष्ट घटनेतच शस्त्र जवळ बाळगण्याची परवानगी देण्यात येते, असे सांगण्यात आले; पण गगन सोम यांनी मतदान केंद्रात पिस्तूल जवळ बाळगल्याचे आढळून आले.
संगीत सोम हे सरढाणा मतदारसंघातील भाजपचे आमदार आहे. 2013मध्ये मुझफ्फरनगरमधील दंगलीदरम्यान केलेल्या वादग्रस्त विधानानंतर ते चर्चेत आले होते.

Web Title: BJP MLA's brother arrested in Meerut