राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी कोणाला? मोदींच्या उपस्थितीक भाजपची बैठक सुरू

bjp parliamentary board meeting to decide party candidate for presidential election 2022
bjp parliamentary board meeting to decide party candidate for presidential election 2022

presidential election 2022 : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. या संदर्भात आज भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक होत असून या बैठकीला पंतप्रधान मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी आणि शिवराज सिंह चौहान यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित आहेत. (bjp parliamentary board meeting to decide party candidate for presidential election 2022)

भाजपच्या या उच्चस्तरीय बैठकीत राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराच्या नावावर चर्चा सुरू आहे. संसदीय पक्षाच्या बैठकीनंतर भाजप राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करू शकते, असे मानले जात आहे.

संसदीय मंडळाच्या बैठकीपूर्वी केंद्रीय मंत्री अमित शहा आणि राजनाथ सिंह यांनी पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली. या बैठकीनंतर सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) त्यांना (नायडू) यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उमेदवार बनविण्याचा विचार करत आहे की काय, अशी अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

रविवारी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. पक्षाच्या वतीने राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत सर्व राजकीय पक्षांशी बोलणी करण्याची जबाबदारी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर सोपवण्यात आली होती. या दोन्ही नेत्यांनी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावावर एकमत करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, टीएमसी सुप्रीमो ममता बॅनर्जी, जेडीयू प्रमुख नितीश कुमार, बीजेडी प्रमुख नवीन पटनायक आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली होती.

bjp parliamentary board meeting to decide party candidate for presidential election 2022
‘मातोश्री’चे निष्ठावंत मानले जाणारे एकनाथ शिंदे! ज्यांनी दिला उद्धव ठाकरेंना झटका

यशवंत सिन्हा यांना उमेदवारी

दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज १९ विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी यशवंत सिन्हा यांच्या नावाला एकमताने पाठिंबा दिला. यशवंत सिन्हा आता २७ जून रोजी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान नवीन राष्ट्रपतीची निवडणूक १८ जुलै रोजी होणार आहे.

bjp parliamentary board meeting to decide party candidate for presidential election 2022
विधान परिषदेतील विजयानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com