'इंदिरा म्हणजेच भारत' म्हणणाऱ्यांनी माफीसुद्धा मागीतलेली नाही- त्रिवेदी

 Bjp Spoke Person Sudhanshu Trivedi statement on emergency
Bjp Spoke Person Sudhanshu Trivedi statement on emergency

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाकडून आज देशभरात काळा दिवस पाळण्यात येत आहे. आजच्या दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. त्यावेळी देशाचे राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद हे होते. त्या काळात काँग्रेसकडून इंदिरा म्हणजेच भारत अशा घोषणा देण्यात येत होत्या. काँग्रेसने आपल्या या घोषणाबाजीसाठी आजवर देशाची साधी माफीसुद्धा मागितलेली नाही, असे मत भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी व्यक्त केले आहे.

तत्कालीन, पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीच्या निर्णयामुळे देशाला कठीण परिस्थितीतून जावे लागले. 25 जून रोजी इंदिरा गांधींनी काढलेल्या आणीबाणीच्या आदेशावर राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी स्वाक्षरी केली होती. त्यानंतर तत्काळ देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्यानंतर जनतेचे सर्व नागरी अधिकार काढून घेण्यात आले होते. वर्तमान पत्रांवरही नियंत्रणे आणण्यात आली होती, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, आजच्याच दिवशी म्हणजे 25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे कारण देत देशव्यापी आणीबाणी जाहीर केली होती. तत्कालीन राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद ह्यांनी संविधानातील कलम 352(1) खाली आणीबाणी जारी केली. 25 जून 1975 पासून लागू करण्यात आलेली आणीबाणी 21 मार्च 1977 रोजी संपुष्टात आली. आणीबाणीचा हा जवळपास 21 महिन्याचा कालावधी होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com