आदित्यनाथांच्या 'त्या' वक्तव्याला भाजपचे समर्थन

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 एप्रिल 2017

सहिदंड (छत्तीसगढ) - तोंडी तलाक संदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यंमत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या वक्तव्याचे भारतीय जनता पक्षाने समर्थन केले आहे. महिलांचे स्वातंत्र्य आणि त्यांचे अधिकार मिळायला हवेत, असे म्हणत भाजपचे नेते संजीव बल्यान यांनी आदित्नाथांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.

बल्यान म्हणाले, 'प्रत्येकाने तोंडी तलाकविरुद्ध उभे राहण्याची गरज आहे. महिलांना त्यांचे अधिकार आणि स्वातंत्र्य मिळायला हवे. जेव्हा आपण महिलांच्या सक्षमीकरणाबद्दल बोलतो तर मग आपण तोंडी तलाक पद्धत लवकरात लवकर संपवत का नाहीत? योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्याला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. महिलांना सुरुवातीपासूनच त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात आले आहे आणि जर आदित्यनाथ जर त्यांच्या बाजूने उभे असतील तर ती चांगली गोष्ट आहे. ते सत्तेत आपल्यापासून राज्यात अनेक बदल घडले आहेत.'

'तोंडी तलाक' पद्धतीच्या मुद्यावर काही जणांनी पाळलेले मौन पाहून आश्‍चर्य वाटत असल्याची प्रतिक्रिया योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केली आहे.