भाजपची 2019 साठी 600 जणांची टीम

वृत्तसंस्था
शनिवार, 29 एप्रिल 2017

देशातील विविध राज्यात विविध निवडणुकांमध्ये विजयाची घोडदौड कायम ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आतापासूनच काम करण्यास सुरुवात केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या देखरेखीखाली पूर्ण वेळ काम करणाऱ्या 600 कार्यकर्त्यांची फौज तयार करण्यात आल्याची माहिती भाजपच्या अंतर्गत सूत्रांनी दिली आहे.

नवी दिल्ली - देशातील विविध राज्यात विविध निवडणुकांमध्ये विजयाची घोडदौड कायम ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आतापासूनच काम करण्यास सुरुवात केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या देखरेखीखाली पूर्ण वेळ काम करणाऱ्या 600 कार्यकर्त्यांची फौज तयार करण्यात आल्याची माहिती भाजपच्या अंतर्गत सूत्रांनी दिली आहे.

अमित शहा हे 2019 लोकसभा निवडणूक पूर्ण होईपर्यंत प्रत्येक लोकसभा मतदारसंघासाठी 15 दिवस पूर्ण वेळ काम करणार आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत काम करणारी 600 जणांची विशेष टीमही तयार सज्ज आहे. भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभेच्या 543 मतदारसंघात प्रत्येकी एक कार्यकर्ता कार्यरत असणार आहे. तर विभागनिहाय पाच मतदारसंघांसाठी एक कार्यकर्ता निरीक्षक म्हणून काम पाहणार आहे.

अमित शहा स्वत: या सर्व कार्यकर्त्यांवर नजर ठेवणार असून गुजरात, ओडिशा, तेलंगणा, लक्षद्वीप आणि पश्‍चिम बंगाल येथे बूथ स्तरावरील व्यवस्थापनही करणार आहेत. या सर्व कामाचा आढावा घेण्यासाठी शहा पुढील तीन महिने संपूर्ण देशाचा दौरा करणार आहते. या दौऱ्यात ते निवडणुकीची रणनीती तयार करणार आहेत.