गोवा, मणिपूरमध्ये भाजपने बहुमत चोरले- चिदंबरम

वृत्तसंस्था
सोमवार, 13 मार्च 2017

निवडणुकीत दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या पक्षाला सरकार स्थापन करण्याचा अधिकारच नाही. भाजप गोवा आणि मणिपूरमध्ये निवडणुकीतून मिळालेले बहुमत चोरत आहे.

नवी दिल्ली - गोवा आणि मणिपूरमधील नागरिकांनी काँग्रेसला बहुमत देऊनही भाजपकडून ते चोरण्यात येत आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केली.

गोव्यात भाजपने अपक्षांसह दोन पक्षांना एकत्र करत सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे. तर, मणिपूरमध्येही सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. यामुळे या दोन्ही राज्यांत काँग्रेस पक्षाला सर्वाधिक जागा मिळूनही भाजप सत्ता स्थापनेकडे जात आहे. गोव्यात संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करण्यात आले आहे.

चिदंबरम यांनी ट्विट करत म्हटले, की निवडणुकीत दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या पक्षाला सरकार स्थापन करण्याचा अधिकारच नाही. भाजप गोवा आणि मणिपूरमध्ये निवडणुकीतून मिळालेले बहुमत चोरत आहे.