पोटनिवडणुकांतही भाजपचीच बाजी

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 एप्रिल 2017

विजयी उमेदवार असे -
- दिल्ली (राजौरी गार्डन) - मनजिंदरसिंग सिरसा (भाजप) 
- मध्य प्रदेश (बांधवगड) - शिवनारायणसिंह (भाजप) 
- मध्य प्रदेश (अटेर) - हेमंत कटारे (कॉंग्रेस) 
- हिमाचल प्रदेश (भोरंज) - डॉ. अनिल धिमान (भाजप) 
- कर्नाटक (नंजनगुड) - एन. कृष्णमूर्ती (कॉंग्रेस) 
- कर्नाटक (गुंडलपेठ) - गीता महादेवप्रसाद (कॉंग्रेस) 
- आसाम (धेमाजी) - रानोज पेगू (भाजप) 
- पश्‍चिम बंगाल (कांथी दक्षिण) - चंद्रिमा भट्टाचार्य (तृणमूल कॉंग्रेस) 
- राजस्थान (धोलपूर) - शोभाराणी कुशवाह (भाजप) 
- झारखंड (लिट्टीपाडा) - सायमन मरांडी (झारखंड मुक्ती मोर्चा) 

नवी दिल्ली - मतदारांवर भाजपचा अद्याप प्रभाव असल्याचे आठ राज्यांतील पोटनिवडणुकांच्या निकालांवरून आज स्पष्ट झाले. आठ राज्यांत दहा जागांसाठी झालेल्या या निवडणुकांत भाजपने पाच जागा जिंकल्या आहेत. कॉंग्रेसला तीन जागा मिळाल्या असून, त्यात मध्य प्रदेशातील अटेरच्या जागेचा समावेश आहे. पश्‍चिम दिल्लीतील राजौरी गार्डनमध्ये आम आदमी पक्षाचा (आप) दारुण पराभव हे या निकालांचे वैशिष्ट्य ठरले. 

दिल्लीसह हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश व आसाममध्ये भाजपने विजय मिळवला. कर्नाटकात मात्र सत्तारूढ कॉंग्रेसने नंजनगुड आणि गुंडलपेठ या दोन्ही जागा जिंकून वर्चस्व कायम राखले. पश्‍चिम बंगालमधील कांथी (दक्षिण) या मतदारसंघात सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसने बाजी मारली, तर झारखंडच्या लिट्टीपाडा (अनुसूचित जमाती) मतदारसंघात झारखण्ड मुक्ती मोर्चाने विजय मिळवला. 

दिल्ली महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तेथे सत्तारूढ "आप'ला पराभवाचा जोरदार झटका बसला. राजौरी गार्डन मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीवर रिंगणात उतरलेल्या अकाली दलाच्या मनजिंदरसिंग सिरसा यांनी "आप'चे उमेदवार हरजितसिंग यांचा 14 हजार मतांनी पराभव केला. येथे "आप'चा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला जाऊन त्याची अनामत रक्कमही जप्त झाली. 

विजयी उमेदवार असे -
- दिल्ली (राजौरी गार्डन) - मनजिंदरसिंग सिरसा (भाजप) 
- मध्य प्रदेश (बांधवगड) - शिवनारायणसिंह (भाजप) 
- मध्य प्रदेश (अटेर) - हेमंत कटारे (कॉंग्रेस) 
- हिमाचल प्रदेश (भोरंज) - डॉ. अनिल धिमान (भाजप) 
- कर्नाटक (नंजनगुड) - एन. कृष्णमूर्ती (कॉंग्रेस) 
- कर्नाटक (गुंडलपेठ) - गीता महादेवप्रसाद (कॉंग्रेस) 
- आसाम (धेमाजी) - रानोज पेगू (भाजप) 
- पश्‍चिम बंगाल (कांथी दक्षिण) - चंद्रिमा भट्टाचार्य (तृणमूल कॉंग्रेस) 
- राजस्थान (धोलपूर) - शोभाराणी कुशवाह (भाजप) 
- झारखंड (लिट्टीपाडा) - सायमन मरांडी (झारखंड मुक्ती मोर्चा) 

Web Title: BJP wins five out of 10 seats, Congress bags three in bypolls