राहुल गांधींवरील हल्ला; भाजप नेत्याला अटक

वृत्तसंस्था
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

या दगडफेकीत राहुल गांधी यांना कोणतीही इजा झाली नव्हती. राहुल गांधी यांनी आज आपल्यावर भाजप आणि संघानेच हल्ला केल्याचा आरोप केला होता. अखेर पोलिसांनीही भाजप नेत्यालाच या हल्ल्याप्रकरणी अटक केली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी जिल्हा स्तरावर आंदोलन केल्यानंतर पोलिसांकडून 18 तासांनंतर कारवाई करण्यात आली.

अहमदाबाद : गुजरातमधील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेलेले कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या मोटारीवर दगडफेक केल्याप्रकरणी भाजपच्या युवा मोर्चाच्या नेत्याला अटक करण्यात आली आहे. 

या दगडफेकीत राहुल गांधी यांना कोणतीही इजा झाली नव्हती. राहुल गांधी यांनी आज आपल्यावर भाजप आणि संघानेच हल्ला केल्याचा आरोप केला होता. अखेर पोलिसांनीही भाजप नेत्यालाच या हल्ल्याप्रकरणी अटक केली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी जिल्हा स्तरावर आंदोलन केल्यानंतर पोलिसांकडून 18 तासांनंतर कारवाई करण्यात आली. पालनपूर युनिटच्या भाजप युवा मोर्चाचा महासचिव जयेश दारजी याला अटक करण्यात आली आहे. तसेच अन्य तिघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या हल्ल्याप्रकरणी शुक्रवारी रात्री पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला होता. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जुन मोधवाधिया आणि इतर काँग्रेस नेत्यांनी वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर तक्रार दाखल करून घेण्यात आली होती. लाल चौकातून धनेरातील हेलिपॅडकडे जात असताना एका व्यक्तीने राहुल गांधी यांच्या मोटारीवर दगडफेक केली. दगडफेकीत मोटारीच्या मागील काचा फुटल्या. गांधी यांना कोणतीही इजा झाली नाही.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा: