जेएनयूमध्ये शस्त्रास्त्रे भरलेली बॅग सापडली

वृत्तसंस्था
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

जेएनएयूतील नॉर्थ गेटच्या आतमध्ये सुरक्षा रक्षकांना आज सकाळी एका काळ्या रंगाच्या बॅगेत ही शस्त्रे आढळून आली.

नवी दिल्ली - दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) विद्यापीठात आज (सोमवार) पहाटे बंदुक व काडतुसे असलेली बॅग सापडल्याने खळबळ उडाली आहे.

जेएनएयूतील नॉर्थ गेटच्या आतमध्ये सुरक्षा रक्षकांना आज सकाळी एका काळ्या रंगाच्या बॅगेत ही शस्त्रे आढळून आली. शस्त्रास्त्रांनी भरलेल्या या बेवारस बॅगेत बंदुक आणि काडतुसे होती. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी बॅग ताब्यात घेतली. पोलिस अधिक तपास करत असून, अज्ञात व्यक्तीविरोधात शस्त्रास्त्र कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जेएनयूमधील विद्यार्थी नजीब अहमद हा गेल्या दोन आठवड्यांपासून बेपत्ता असल्याने याबाबत चर्चा होत असताना आता शस्त्रस्त्रांची बॅग सापडल्याने पुन्हा एकदा जेएनयू चर्चेत आले आहे. 

Web Title: black bag full of weapons found in jnu