काळ्या पैशाच्या समर्थनासाठी काळा दिवस: भाजप

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : नोटाबंदीच्या निर्णयाला महिना उलटून गेल्यानंतरही परिस्थिती बदलली नसल्याचे म्हणत आज (बुधवार) काळा दिवस पाळणाऱ्या विरोधकांना भारतीय जनता पक्षाने जोरदार प्रत्युत्तर दिले असून 'काळ्या पैशाच्या समर्थनासाठी काळा दिवस पाळला जात आहे', असा आरोप केला आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी "सत्याचा विजय व्हावा यासाठी महात्मा गांधी यांनी आंदोलन उभारले आणि त्यांचेच नाव धारण करणारे हे काय करत आहेत?' असा प्रश्‍न उपस्थित करत टीका केली आहे. तसेच विरोधक 'काळा दिवस' पाळत नसून काळ्या पैशाला समर्थन देण्यासाठी आवाज उठवत आहेत, असेही ते पुढे म्हणाले. तर "माध्यमांमध्ये स्थान मिळावे यासाठी विरोधक निषेध व्यक्त करत आहेत. सरकार सभागृहात चर्चा करण्यासाठी तयार आहे', अशा प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांनी व्यक्त केल्या.

नोटाबंदीच्या निर्णयाला महिना झाल्याने विरोधक आज संसद परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ एकत्र येत "काळा दिवस' साजरा करत आहेत. नोटाबंदीचा निर्णय मूर्खपणाचा असल्याचे म्हणत पेटीएम हे "पे टू मोदी' असल्याची टीका कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. तर बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनीही सरकारवर निशाणा साधत, "खऱ्या अर्थाने 90 टक्के जनतेसाठी 8 नोव्हेंबरपासूनच काळा दिवस सुरु झाला आहे. त्यांच्यासाठी एक संपूर्ण महिना काळा दिवसाप्रमाणे गेला आहे' अशी टीका केली आहे.